Zechariah (14/14)    

1. पाहा! परमेश्वराचा न्यायदानाचा ठराविक दिवस आहे. तुम्ही लुटलेली संपत्ती तुमच्या शहरात वाटली जाईल.
2. यरुशलेमशी लढण्यासाठी मी सर्व राष्ट्रांना एकत्र करीन. ते नगरी ताब्यात घेतील आणि घरांचा नाश करतील. स्त्रियांवर बलात्कार करतील व अर्धे - अधिक लोक कैद केले जातील. पण उरलेल्या लोकांना नगरीतून नेले जाणार नाही.
3. मग परमेश्वर त्या राष्ट्रांविरुध्द युध्द पुकारेल ते खरोखरीचे युध्द असेल.
4. त्यावेळी, तो यरुशलेमच्या पूर्वेला असलेल्या जैतून पर्वतावर उभा राहील. जैतुन पर्वत दुभंगेल पर्वताचा काही भाग उत्तरेकडे व काही दक्षिणेकडे सरकेल. पूर्वेकडून पश्चिमेपर्यंत एक खोल दरी निर्माण होईल.
5. दरी जसजशी रुंदावून तुमच्याकडे सरकेल, तसतसे तुम्ही दूर पळायचा प्रयत्न कराल यहूदाचा राजा उज्जीया ह्याच्या काळात झालेल्या भूकंपाच्या वेळी तुम्ही जसे पळाला तसे पळाल. पण माझा परमेश्वर, देव तेथे अवतरेल आणि त्याच्याबरोब त्याचे सर्व पवित्र अनुयायी असतील.
8. तेव्हा यरुशलेममधून सतत जिवंत पाण्याचा झरा वाहील त्याला दोन पाट फुटतील. एक पाट पूर्वेकडे वाहत जाईल तर दुसरा पश्चिमेकडे वाहत जाऊन भूमध्य समुद्राला मिळेल. तो संपूर्ण वर्षभर - हिवाळ्यात व उन्हाळ्यात वाहील.
9. त्यावेळी, परमेश्वर सर्व पृथ्वीचा राजा असेल. परमेश्वर एकच आहे व त्याचे नावही “एक”च आहे.
10. तेव्हा यरुशलेमभोवतालचा सर्व प्रदेश अराबाच्या वाळवटासारखा ओसाड होईल. निगेवमधील गेबापासून रिम्मोनपर्यंत पसरलेल्या वाळवंटासारखा तो देश होईल. पण सर्व यरुशलेम मात्र पुन्हा उभारले जाईल - अगदी बन्यामीनच्या प्रवेशद्वारापासून ते पाहिल्या प्रवेशद्वारापर्यंत (कोपऱ्यावरच्या द्वारापर्यंत) आणि हनानेलच्या मनोऱ्यापासून राजाच्या द्राक्षकुंडापर्यंत)
11. लोक तेथे वस्ती करण्यास जातील. यापुढे कोणीही शत्रू त्यांचा नाश करायला येणार नाही. यरुशलेम अगदी सुरक्षित असेल.
12. पण यरुशलेमविरुध्द लढलेल्या राष्ट्रांना परमेश्वर शिक्षा करील. तो त्या राष्ट्रांना रोगराईने पछाडेल. जिवंतपणीच लोकांची कातडी कुजू लागेल. त्याचे डोळे त्यांच्या खाचांत आणि जिभा तोंडांत सडतील.
16. यरुशलेमशी लढण्यास आलेल्यापैकी काही वाचतील. आणि सर्व शक्तिमान परमेश्वराची उपासना करण्यासाठी ते दरवर्षी येतील. मंडपाचा सण साजरा करायला ते यरुशलेमला येतील.
17. पृथ्वीवरील कोणत्याही कुटुंबातील लोक यरुशलेमला प्रभुराजाची, सर्व शक्तिमान परमेश्वराची उपासना करायला गेले नाहीत तर परमेश्वर त्यांच्या प्रदेशात पाऊस पाडणार नाही.
18. जर मिसरमधील एखादे घराणे मंडपाचा सण साजरा करण्यासठी आले नाही, तर शत्रूंच्या राष्ट्रांत परमेश्वराने जो भयंकर रोग पसरविला होता, तो रोग त्यांना होईल.
19. “मंडपाच्या साणा”लान आल्याबद्दल मिसरला व इतर राष्ट्रांना ही शिक्षा असेल.
20. त्यावेळी, सर्व गोष्टी देवाच्या मालकीच्या असतील अगदी घोड्यांच्या सरंजामावरसुध्दा परमेश्वरासाठी पवित्र अशी चिठ्ठी असेल. परमेश्वराच्या मंदिरात वापरली जाणारी भांडी, वेदीवर वापरल्या जाणाऱ्या कटोऱ्यांइतकीच महत्वाची असतील.
21. खरे, म्हणजे, यरुशलेममधील व यहूदातील प्रत्येक ताटावर सर्व शक्तिमान परमेश्वरास पवित्र असे लिहिलेले असेल. परमेश्वराची उपासना करणारा प्रत्येकजण या भांड्यांमध्ये अन्न शिजवून खाऊ शकेल. त्यावेळी सर्व शक्तिमान परमेश्वराच्या मंदिरात वस्तूंची खरेदी - विक्री करणारे कोणीही व्यापारी नसतील.

  Zechariah (14/14)