Psalms (98/150)  

1. परमेश्वराने नवीन आणि अद्भुत गोष्टी केल्या म्हणून त्याच्यासाठी नवीन गाणे गा.
2. त्याच्या पवित्र उजव्या बाहूने त्याच्याकडे विजय परत आणला.
3. परमेश्वराने राष्ट्रांना त्याची उध्दाराची शक्ती दाखवली. परमेश्वराने त्यांना त्याचा चांगुलपणा दाखवला.
4. त्याच्या भक्तांना इस्राएलाच्या लोकांशी असलेला देवाचा प्रामाणिकपणा आठवला. दूरच्या प्रदेशातील लोकांना देवाची वाचवण्याची शक्ती दिसली.
5. पृथ्वीवरच्या प्रत्येक माणसा, परमेश्वराचा जयजयकार कर. त्वरेने त्याचे गुणवर्णन करायला सुरुवात कर.
6. वीणे, परमेश्वराची स्तुती करा. वीणेच्या झंकारांनो, त्याची स्तुती करा.
7. कर्णे आणि शिंग वाजवून आपल्या राजाचे, परमेश्वराचे गुणवर्णन करा.
8. समुद्र, पृथ्वी आणि त्यावरील सर्व वस्तूंना जोर जोरात गाऊ द्या.
9. नद्यांनो, टाळ्या वाजवा पर्वतांनो, सगळ्यांनी बरोबर गाणे गा.

  Psalms (98/150)