← Psalms (52/150) → |
1. | बलवान पुरुषा, तू तुझ्या दुष्कर्मांची बढाई का करीत आहेस? तू देवाला एक कलंक आहेस. तू दिवसभर वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखतोस. |
2. | तू मूर्खासारख्या योजना आखतोस आणि तुझी जीभ धारदार वस्तऱ्यासारखी भयंकर आहे. तू नेहमी खोटे बोलतोस आणि कुणाची तरी फसवणूक करण्याच्या बेतात असतोस. |
3. | तू चांगल्यापेक्षा वाईटावर अधिक प्रेम करतोस. तुला खरे बोलण्यापेक्षा खोटे बोलणे अधिक आवडते. |
4. | तुला आणि तुझ्या खोटे बोलणाऱ्या जिभेला लोकांना त्रास द्यायला आवडते. |
5. | म्हणून देव तुझा कायमचा नाश करेल. तो तुला पकडून तुझ्या घरातून बाहेर खेचेल. तो तुला मारुन टाकेल आणि तुझा निर्वंश करेल. |
6. | चांगले लोक ते बघतील आणि त्यावरुन. ते देवाला घाबरायला आणि त्याचा आदर करायला शिकतील. ते तुला हसतील. |
7. | व म्हणतील, “जो देवावर अवलंबून नव्हता त्याचे काय झाले पाहा त्याची संपत्ती आणि त्याचे खोटे बोलणे त्याला वाचवू शकेल असे त्याला वाटत होते.” |
8. | पण देवाच्या मंदिरात मी हिरव्यागार व दीर्घकाळ जगणाऱ्या जैतून झाडासारखा आहे. मी देवाच्या प्रेमावर सदैव विश्र्वास ठेवतो. |
← Psalms (52/150) → |