| ← Psalms (29/150) → |
| 1. | देवाच्या मुलांनो, परमेश्वराची स्तुती करा. त्याच्या गौरवाची व सामर्थ्याची स्तुती करा. |
| 2. | परमेश्वाराची स्तुती करा आणि त्याच्या नावाचा आदर करा. तुमच्या खास कपड्यात त्याची उपासना करा. |
| 3. | परमेश्वर समुद्रासमोर त्याचा आवाज चढवतो गौरवशाली देवाचा आवाज समुद्रावरील मेघ गर्जनेसारखा वाटतो. |
| 4. | परमेश्वराच्या आवाजातून त्याची शक्ती कळते. त्याचा आवाज त्याचे गौरव दाखवते. |
| 5. | परमेश्वराच्या आवाजामुळे खूप मोठा देवदारुवृक्ष तुकडे तुकडे होऊन पडतो. परमेश्वर लबोनानच्या देवदार वृक्षाचे तुकडे करतो. |
| 6. | परमेश्वर लबोनानचा थरकाप उडवतो, तो छोट्या वासराप्रमाणे नाचत आहे असे वाटते. सिर्योन थरथरतो तो छोट्या करड्या प्रमाणे उड्या मारत आहे असे वाटते. |
| 7. | परमेश्वराचा आवाज विजेच्या चकचकाटासहित आघात करतो. |
| 8. | परमेश्वराचा आवाज वाळवंटाला कंपित करतो कादेशचे वाळवंट परमेश्वराच्या आवाजाने हादरते. |
| 9. | परमेश्वराच्या आवाजाने हरणाला भीती वाटते तो जंगलांचा नाश करतो. परंतु त्याच्या राजवाड्यात लोक त्याच्या महानतेची स्तुती करतात. |
| 10. | महापुराच्यावेळी परमेश्वर राजा होता आणि परमेश्वरच राजा राहणार आहे. |
| 11. | परमेश्वर त्याच्या लोकांचे रक्षण करो. परमेश्वर त्याच्या माणसांना आशीर्वाद देवो. |
| ← Psalms (29/150) → |