| ← Psalms (26/150) → |
| 1. | परमेश्वरा, माझा न्याय कर. मी सच्चे आयुष्य जगलो हे सिध्द कर. मी परमेश्वरावर विश्वास ठेवणे कधीही सोडले नाही. |
| 2. | परमेश्वरा, माझी चौकशी कर माझी परीक्षा घे. माझ्या ह्दयात आणि मनात अगदी जवळून पाहा. |
| 3. | मी नेहमीच तुझे कोवळे प्रेम बघतो. मी तुझ्या सत्याच्या आधाराने जगतो. |
| 4. | मी कपटी लोकांबरोबर जात नाही, मी ढोंगी लोकांची कधीही संगत धरीत नाही. |
| 5. | मी त्या दुष्टांच्या टोळीचा तिरस्कार करतो. मी त्या दुष्टांच्या टोळीत कधीही सामील होणार नाही. |
| 6. | परमेश्वरा, मी हात स्वच्छ धुवून तुझ्या वेदीजवळ आलो आहे. |
| 7. | परमेश्वरा, मी तुझे स्तुतीपर गाणे गातो तू ज्या ज्या आश्चर्यकारक गोष्टी केल्या आहे सत्यांची गाणी मी गातो. |
| 8. | परमेश्वरा, मला तुझे मंदिर आवडते. मला तुझा तेजस्वी तंबू आवडतो. |
| 9. | परमेश्वरा, मला पाप्यांच्या यादीत बसवू नकोस. त्या खुन्यांबरोबर मला मारु नकोस. |
| 10. | ते लोक इतरांना फसवतील. वाईट गोष्टी करण्यासाठी ते पैसाही घेतील. |
| 11. | परंतु मी निरपराध आहे. म्हणून देवा माझ्यावर दया करआणि मला वाचव. |
| 12. | मी सर्व धोक्यांपासून सुरक्षित आहे. परमेश्वरा, तुझे भक्त भेटतात तेव्हा मी तुझी स्तुती करतो. |
| ← Psalms (26/150) → |