Psalms (150/150)    

1. परमेश्वराची स्तुती करा देवाची त्याच्या मंदिरात स्तुती करा. त्याच्या सामर्थ्याची स्वर्गात स्तुती करा.
2. देव ज्या महान गोष्टी करतो त्याबद्दल त्याची स्तुती करा. त्याच्या सर्व मोठेपणाबद्दल त्याची स्तुती करा.
3. तुतारी आणि कर्णा वाजवून देवाचे गुणगान करा. सतारीवर आणि वीणेवर त्याचे गुणगान करा.
4. डफ वाजवून आणि नाचून देवाची स्तुती करा. तंतुवाद्यावर आणि बासरीवर त्याचे गुणगान करा.
5. जोर जोरात टाळ वाजवून देवाची स्तुती करा. झणझणणाऱ्या झांजांवर त्याचे गुणगान करा.
6. प्रत्येक जिवंत वस्तू परमेश्वराची स्तुती कर. परमेश्वराची स्तुती कर.

  Psalms (150/150)