← Psalms (146/150) → |
1. | परमेश्वराची स्तुती करा. माझ्या आत्म्या, परमेश्वराची स्तुती कर. |
2. | मी आयुष्यभर परमेश्वराची स्तुती करीन. मी आयुष्यभर त्याचे गुणगान करीन. |
3. | तुमच्या नेत्यांवर मदतीसाठी अवलंबून राहू नका. लोकांवर विश्वास टाकू नका. का? कारण लोक तुम्हाला वाचवू शकत नाहीत. |
4. | लोक मरतात आणि त्यांचे दफन केले जाते आणि नंतर मदतीच्या त्यांच्या सगळ्या योजनाही जातात. |
5. | पण जे लोक देवाला मदतीबद्दल विचारतात ते सुखी असतात. ते लोक परमेश्वरावर, त्यांच्या देवावर अवलंबून असतात. |
6. | परमेश्वराने स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केली. परमेश्वराने समुद्र आणि त्यातल्या सर्व गोष्टी निर्माण केल्या. परमेश्वर त्यांचे सदैव रक्षण करील. |
7. | जे लोक दु:खी कष्टी आहेत. त्यांच्यासाठी परमेश्वर योग्य गोष्टी करतो. तो भुकेल्यांना अन्न देतो. तुरुंगात बंद असलेल्यांना तो सोडवतो. |
8. | परमेश्वर आंधळ्यांना पुन्हा दिसू लागण्यासाठी मदत करतो. संकटात असलेल्या लोकांना परमेश्वर मदत करतो. परमेश्वराला चांगले लोक आवडतात. |
9. | परमेश्वर आपल्या देशातल्या परक्यांचे रक्षण करतो. परमेश्वर विधवांची आणि अनांथांची काळजी घेतो. परंतु परमेश्वर वाईट लोकांचा नाश करतो. |
10. | परमेश्वर सदैव राज्य करील सियोन तुझा देव सदैव राज्य करीत राहील परमेश्वराची स्तुती करा. |
← Psalms (146/150) → |