← Psalms (144/150) → |
1. | परमेश्वर माझा खडक आहे. परमेश्वराला धन्यवाद द्या. परमेश्वर मला युध्दाचे शिक्षण देतो. परमेश्वर मला लढाईसाठी तयार करतो. |
2. | परमेश्वर माझ्यावर प्रेम करतो. परमेश्वर माझी पर्वतावरची उंचसुरक्षित जागा आहे. परमेश्वर माझी सुटका करतो. परमेश्वर माझी ढाल आहे. मी त्याच्यावर वश्वास ठेवतो. परमेश्वर मला माझ्या लोकांवर राज्य करायला मदत करतो. |
3. | परमेश्वरा, तुला लोक महत्वाचे का वाटतात? आम्ही तुझ्या लक्षात तरी कसे येतो? |
4. | माणसाचे आयुष्य म्हणजे हवेचा झोत, माणसाचे आयुष्य म्हणजे नाहीशी होत जाणारी सावली. |
5. | परमेश्वरा, आकाश फाड आणि खाली ये, पर्वतांना हात लाव आणि त्यांतून धूर बाहेर येईल. |
6. | परमेश्वरा, विजेला पाठव आणि माझ्या शत्रूला पांगव, तुझे बाण सोड आणि त्यांना पळवून लाव. |
7. | परमेश्वरा, स्वर्गातून खाली पोहोच आणि मला वाचव. मला या शत्रूंच्या समुद्रात बुडू देऊ नकोस. मला त्या परक्यांपासून वाचव. |
8. | हे शत्रू खोटारडे आहेत. ते खऱ्या नसलेल्या गोष्टी सांगतात. |
9. | परमेश्वरा, मी तू करत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दलचे नवे गाणे गाईन. मी तुझी स्तुती करेन आणि दहा तारांची वीणा वाजवेन. |
10. | परमेश्वर राजांना त्यांच्या लढाया जिंकायला मदत करतो. परमेश्वराने त्याचा सेवक दावीद याला त्याच्या शत्रूंच्या तलवारीपासून वाचवले. |
11. | मला या परक्यांपासून वाचव. हे शत्रू खोटारडे आहेत. ते खऱ्या नसलेल्या गोष्टी सांगतात. |
12. | आमची तरुण मुले बळकट झाडांसाखी आहेत. आमच्या मुली राजवाड्यातल्या सुंदर सजावटीप्राणे आहेत. |
13. | आमची धान्यांची कोठारे वेगवेगळ्या धान्यांनी भरलेली आहेत. आमच्या शेतात हजारो मेंढ्या आहेत. |
14. | आमचे सैनिक सुरक्षित आहेत. कुठलाही शत्रू आत येण्याचा प्रचत्न करीत नाही. आम्ही लढाईवर जात नाही. आमच्या रस्त्यात लोक ओरडत नाहीत. |
15. | अशा वेळी लोक खूप आनंदी असतात. जर परमेश्वर त्यांचा देव असेल तर लोक खूप आनंदी असतात. |
← Psalms (144/150) → |