Psalms (133/150)  

1. जेव्हा देवाचे लोक शांततेने एकत्र नांदतात, तेव्हा ते खरोखरच खूप चांगले आणि आल्हाददायक असते.
2. ते गोड वास असलेल्या, याजकाच्या डोक्यावर ओतलेल्या तेलासारखे, अहरोनाच्या दाढीतून ओघळणाऱ्या तेलासारखे, अहरोनाच्या खासकपड्यातून ओघळणाऱ्या तेलासारखे वाटते.
3. हर्मोन पर्वतावरुन सियोनवर पडणाऱ्या हळूवार पावसासारखे वाटते. सियोन पर्वतावरच परमेश्वराने त्याचे आशीर्वाद, त्याचे शाश्वत जीवनाचे आशीर्वाद दिले.

  Psalms (133/150)