Psalms (126/150)  

1. परमेश्वर जेव्हा आपली परत सुटका करील तेव्हा ते स्वप्नासारखे असेल.
2. आपण हसत आनंदाचे गाणे गात असू. इतर देशांतील लोक म्हणतील, “इस्राएलाच्या लोकांसाठी परमेश्वराने फार चांगली गोष्ट केली.”
3. होय, परमेश्वराने जर आपल्यासाठी ती चांगली गोष्ट केली तर आपण खूप आनंदी होऊ.
4. परमेश्वरा, वाळवंटातले झरे पुन्हा पाण्याने भरुन वहायला लागतात. तसं आम्हाला पुन्हा मुक्त कर.
5. एखादा माणूस बी पेरते वेळी दु:खी असू शकेल. पण तो जेव्हा पीक गोळा करतो तेव्हा तो आनंदी असतो.
6. तो जेव्हा बी शेतात नेतो तेव्हा तो दु:खी होईल. पण तो जेव्हा धान्य घरी आणतो तेव्हा आनंदी असतो.

  Psalms (126/150)