Psalms (125/150)  

1. जे लोक परमेश्वरावर विश्वास ठेवतात ते सियोन पर्वतासारखे आहेत. ते कधीही थरथरणार नाहीत. ते सदैव असतील.
2. यरुशलेमच्या सभोवती पर्वत आहेत आणि परमेश्वर त्याच्या माणसांभोवती आहे. तो त्याच्या माणसांचे सदैव रक्षण करील.
3. दुष्ट लोक चांगल्या माणसांच्या जमिनीवर कधीही ताबा मिळवू शकणार नाहीत. जर तसे घडले तर चांगले लोकही वाईट वागायला लागतील.
4. परमेश्वरा, तू चांगल्या लोकांशी चांगला राहा. ज्या लोकांची मने शुध्द आहेत त्यांच्याशी तू चांगला राहा.
5. दुष्ट लोक वाईट गोष्टी करतात. परमेश्वर त्या दुष्ट लोकांना शिक्षा करील. इस्राएलमध्ये शांती नांदू दे.

  Psalms (125/150)