Psalms (124/150)  

1. परमेश्वर जर आपल्या बाजूला नसता तर आपले काय झाले असते? इस्राएल, मला उत्तर दे.
2. लोकांनी आपल्यावर हल्ला केला तेव्हा जर परमेश्वर आपल्या बाजूला नसता तर आपले काय झाले असते?
3. आपले शत्रू आपल्यावर जेव्हा रागावले असते तेव्हा त्यांनी आपल्याला जिवंत गिळले असते.
4. आपल्या शत्रूंचे सैन्य महापुरासारखे आपल्या अंगावरुन गेले असते. नदी प्रमाणे त्यांनी आपल्याला बुडवले असते.
5. गर्विष्ठ लोकांनी वर वर चढणाऱ्या पाण्याप्रमाणे आपल्या तोंडापर्यंत येऊन आपल्याला बुडवले असते.
6. परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराने आपल्या शत्रूंना आपल्याला पकडू दिले नाही आणि ठार मारु दिले नाही.
7. जाळ्यात सापडलेल्या आणि नंतर त्यातून सुटलेल्या पक्ष्याप्रमाणे आपण आहोत. जाळे तुटले आणि आपण त्यातून सुटलो.
8. परमेश्वराकडून आपली मदत आली. परमेश्वराने पृथ्वी आणि स्वर्ग निर्माण केला.

  Psalms (124/150)