Psalms (121/150)  

1. मी वर डोंगरांकडे बघतो. पण माझी मदत खरोखर कुठून येणार आहे?
2. माझी मदत परमेश्वराकडून, स्वर्ग व पृथ्वी यांच्या निर्मात्याकडून येणार आहे.
3. देव तुला खाली पडू देणार नाही. तुझा पाठीराखा झोपी जाणार नाही.
4. इस्राएलचा पाठीराखा झोपाळू होत नाही. देव कधीही झोपत नाही.
5. परमेश्वर तुझा पाठीराखा आहे तो त्याच्या महान शक्तीने तुझे रक्षण करतो.
6. दिवसा सूर्य तुला दु:ख पोहोचवणार नाही. आणि रात्री चंद्र तुला इजा करणार नाही.
7. परमेश्वर तुझे प्रत्येक संकटापासून रक्षण करील. परमेश्वर तुझ्या आत्म्याचे रक्षण करील.
8. परमेश्वरा तुला जाण्या - येण्यात मदत करील. परमेश्वर तुला आता मदत करील आणि सदैव मदत करत राहील.

  Psalms (121/150)