Psalms (1/150)  

1. माणसाने जर वाईट लोकांचा सल्लामानला नाही, तो पापी लोकांसारखा राहिला नाही आणि देवावर विश्वास न ठे वणाऱ्या लोकांबरोबर राहाणे त्याला आवडले नाही तर तो माणूस खरोखरच सुखी होईल.
2. चांगल्या माणसाला परमेश्वराची शिकवण आवडते तो त्याबद्दल रात्रंदिवस विचार करत असतो.
3. त्यामुळे तो माणूस ओढ्याच्या कडेला लावलेल्या झाडासारखा शक्तिशाली होऊ शकतो तो योग्यवेळी फळे येणाऱ्या झाडासारखा असतो तो पाने असलेल्या व न मरणाऱ्या झाडासारखा असतो तो जे काही करतो ते यशस्वी होते.
4. परंतु वाईट लोक असे नसतात ते वाऱ्यावर उडून जाणाऱ्या फोलपटासारखे असतात.
5. न्यायालयातील खटल्याचा निवाडा करण्यासाठी जर चांगले लोक एकत्र आले तर वाईट लोकांना अपराधी ठरविले जाईल ते पापीलोक निरपराध ठरविले जाणार नाहीत.
6. का? कारण परमेश्वर चांगल्यांचे रक्षण करतो आणि वाईटाचे निर्दालन करतो.

      Psalms (1/150)