← Proverbs (28/31) → |
1. | वाईट लोकांना सगळ्याचीच भीती वाटते. कोणी त्यांचा पाठलाग करत नसले तरी ते दूर पळतात. पण चांगला माणूस सिंहासाखा शूर असतो. |
2. | जर देशाने आज्ञा पाळायला नकार दिला तर तिथले बरेचसे वाईट नेते केवळ थोड्या काळापुरतेच राज्य करु शकतील. पण जर देशाला एकच शहाणा नेता असला तर देश खूप काळापर्यंत राहील. |
3. | राजाने जर गरीब लोकांवर संकटे आणली तर तो पीक उद्ध्वस्त करणाऱ्या जोरदार पावसासारखा असतो. |
4. | तुम्ही जर कायदा पाळायला नकार दिलात तर तुम्ही वाईट लोकांच्या बाजूचे होत. पण तुम्ही कायदा पाळलात तर तुम्ही त्यांच्या विरुध्द असता. |
5. | वाईट लोकांना न्याय कळत नाही. पण जे परमेश्वरावर प्रेम करतात त्यांना सर्वकाही कळते. |
6. | गरीब असून प्रामाणिक असणे हे श्रीमंत असून वाईट असण्यापेक्षा चांगले असते. |
7. | जो माणूस कायद्याचे पालन करतो तो हुशार असतो. पण जो माणूस क्षुल्लक माणसांशी मैत्री करतो तो त्याच्या वडिलांना लाज आणतो. |
8. | जर तुम्ही गरीबांना फसवून श्रीमंत झालात तर तुम्ही लवकरच संपत्ती गमवाल. जो माणूस त्यांच्याशी दयाळू असतो त्याच्याकडे ती जाईल. |
9. | जर एखाद्याने देवाच्या शिकवणुकीकडे लक्ष द्यायला नकार दिला तर देव त्याची प्रार्थना ऐकायला नकार देईल. |
10. | वाईट माणूस चांगल्या माणसांना दु:ख देण्याच्या योजना आखतो. परंतु वाईट माणूस त्याच्याच जाळ्यात अडकेल आणि चांगल्या माणसाच्या बाबतीत चांगल्या घटना घडतील. |
11. | श्रीमंत लोकांना नेहमी आपण खूप शहाणे आहोत असे वाटत असते. पण शहाणा असलेला गरीब माणूस खरे काय ते पाहू शकतो. |
12. | चांगले लोक नेते बनले की सर्वजण आनंदी असतात. पण वाईट माणूस निवडून आला की सर्व लपून बसतात. |
13. | माणसाने जर त्याची पापे लपवायचा प्रयत्न केला तर तो कधीही याशस्वी होणार नाही. पण जर त्याने त्याच्या पापांची कबुली दिली आणि लोकांना सांगितले की त्याचे चुकले तर देव आणि इतर लोक त्याला दया दाखवतील. |
14. | जर एखाद्याने नेहमी परमेश्वराचा आदर केला तर त्याला आशीर्वाद मिळेल. पण जर तो हट्टी असला आणि त्याने परमेश्वराचा आदर करायला नकार दिला तर त्याच्यावर संकटे येतील. |
15. | दुष्ट माणूस जेव्हा दुबळ्या लोकांवर राज्य करतो तेव्हा तो रागावलेल्या सिंहासारखा किंवा अस्वलासारखा लढाईला तयार असतो. |
16. | जर राज्यकर्ता शहाणा नसला तर तो त्याच्या हाताखालच्या लोकांना दु:ख देतो. पण जर राज्यकर्ता प्रामाणिक असला आणि त्याला फसवणे आवडत नसले तर तो खूप काळपर्यंत राज्य करेल. |
17. | जर एखाद्याने कुणाला ठार मारण्याचा अपराध केला असेल. तर त्याला कधीही मन:शांती लाभणार नाही. त्या माणसाला कधीही आधार देऊ नका. |
18. | माणूस जर योग्य जीवन जगत असला तर तो सुरक्षित असेल. पण जर तो दुष्ट असेल तर तो त्याची शक्ती घालवून बसेल. |
19. | जो माणूस खूप काम करतो त्याला भरपूर खायला मिळेल. पण जो स्वप्ने बघण्यात वेळ घालवतो तो गरीबच राहील. |
20. | जो देवाची भक्ती करतो त्याला देव आशीर्वाद देईल. पण जो माणूस फक्त श्रीमंत होण्याचा प्रयत्न करतो त्याला शिक्षा होईल. |
21. | न्यायाधीशाने नेहमी न्यायी असले पाहिजे. एखाद्याला तो चांगला ओळखतो म्हणून त्याला मदत करता कामा नये. पण काही न्यायाधीश थोड्याशा पैशांसाठी त्यांचे निर्णय बदलतात. |
22. | स्वार्थी माणसाला फक्त श्रीमंत व्हायचे असते. त्याला हे कळत नाही की तो गरीब होण्याच्या मार्गाला लागला आहे. |
23. | जर तुम्ही एखाद्याला तो चुकतो आहे असे सांगून मदत केलीत तर तो नंतर तुमच्याबद्दल आनंदी होईल. लोकांबरोबर नेहमी गोडगोड बोलण्यापेक्षा हे खूप चांगले. |
24. | काही लोक त्यांच्या आई वडिलांची चोरी करतात. “ह्यात काही चूक नाही” असे ते म्हणतात. पण तो माणूस घरात येऊन सगळ्याचा नाश करणाऱ्या माणसाइतकाच दोषी आहे. |
25. | स्वार्थी. माणूस संकटे निर्माण करतो. पण जो परमेवरावर विश्वास ठेवतो त्याला बक्षीस मिळते. |
26. | जर एखादा माणूस स्वत:वरच विश्वास ठेवेल तर तो मूर्ख आहे. पण जर तो शहाणा असेल तर तो संकटातून सुटेल. |
27. | जर एखाद्याने गरीब लोकांना दिले तर त्याच्या सगळ्या गरजा पूर्ण होतील. पण जर एखाद्याने गरीबांना मदत करायला नकार दिला तर त्याच्यावर खूप संकटे येतील. |
28. | दुष्ट माणूस जर राज्य करण्यासाठी निवडून आला तर लोक लपून बसतील. पण त्या दुष्टाचा जर पराभव झाला तर चांगले लोक पुन्हा राज्य करतील. |
← Proverbs (28/31) → |