Numbers (1/36) → |
1. | इस्राएल लोक मिसर देशातून निघाल्यावर दुसऱ्या वर्षाच्या दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या दिवशी सीनाय रानातील दर्शनमंडपात परमेश्वर मोशेशी बोलला; तो म्हणाला, |
2. | “सर्व इस्राएल लोकांची शिरगणती कर; प्रत्येक पुरुषाचे नांव, त्याचे कूळ आणि त्याच्या वाडवडिलांचे घराणे ह्यांच्यासह त्यांच्या नावांची यादी कर. |
3. | वीस वर्षाचे किंवा त्याहून अधिक वयाचे जितके पुरुष युद्धास लायक असतील त्या सर्वाची त्यांच्या दलाप्रमाणे तू आणि अहरोन मिळून गणती करा. |
4. | प्रत्येक वंशातला एकजण तुम्हाला मदत करील तो त्या वंशाचा प्रमुख असेल. |
5. | तुमच्याबरोबर राहून तुम्हाला मदत करणाऱ्यांची नावे ही: रऊबेन वंशातला शदेयुराचा मुलगा अलीसूर; |
6. | शिमोन वंशातला सुरीशादैचा मुलगा शलूमियेल; |
7. | यहुदा वंशातला अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन; |
8. | इस्साखार वंशातला सुवाराचा मुलगा नथनेल; |
9. | जबुलून वंशातला हेलोनाचा मुलगा अलीयाब; |
10. | योसेफ पुत्राच्या वंशात म्हणजे एफ्राइम वंशातला अम्मीहूदाचा मुलगा अलीशामा, आणि मनश्शे वंशातला पदाहसुराचा मुलगा गमलीयेल. |
11. | बन्यामीन वंशातला गदोनीचा मुलगा अबीदान; |
12. | दान वंशातला आम्मीशद्दैचा मुलगा अहीएजर; |
13. | आशेर वंशातला आक्रानाचा मुलगा पागीयेल; |
14. | गाद वंशातला दगुवेलाचा मुलगा एल्यासाप; |
15. | नफताली वंशातला एनानाचा मुलगा अहीरा;” |
16. | 1हे सर्वजण आपापल्या घराण्याचे प्रमुख होते; लोकांनीही त्यांना आपापल्या कुळाचे सरदार म्हणून निवडले. |
17. | प्रमुख म्हणून निवडलेल्या ह्या सर्वांना मोशे व अहरोन ह्यांनी आपल्याबरोबर घेतले; |
18. | आणि त्यांनी सर्व इस्राएल लोकांना एकत्र जमविले; मग त्यांच्या कुळांप्रमाणे व त्यांच्या घराण्यांप्रमाणे त्यांची नोंद करण्यात आली. वीस किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्यांची यादी करण्यात आली. |
19. | परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती अगदी त्याप्रमाणे त्याने सीनाय रानात त्यांची गणती केली. |
20. | इस्राएलाचा ज्येष्ठ पुत्र-थोरला मुलगा-रऊबेन ह्याच्या वंशाचे लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी त्यांची गणना करण्यात आली. ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यापेक्षा अधिक वयाचे असून सैन्यात दाखल होण्यास लायक होते त्यांची यादी करण्यात आली; त्यांची यादी घराणी आणि कुळे ह्यांच्याप्रमाणे करण्यात आली. |
21. | ती मोजदाद एकूण शेहेचाळीस हजार पाचशे भरली. |
22. | शिमोन वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यापेक्षा अधिक क्याचे असून सैन्यात दाखल होण्यास लायक होते त्यांची यादी करण्यात आली; |
23. | ती मोजदाद एकूण एकुणसाठ हजार तीनशे भरली. |
24. | गाद वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यापेक्षा अधिक क्याचे असून सैन्यात दाखल होण्यास लायक होते त्यांची यादी करण्यात आली; |
25. | ती मोजदाद एकूण पंचेचाळीसहजार सहाशे पन्नास भरली. |
26. | यहुदा वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यापेक्षा अधिक वयाचे असून सैन्यात सेवा करण्यास लायक होते, त्या सर्वाची नोंद करण्यात आली; |
27. | ती मोजदाद एकूण चौऱ्याहत्तर हजार सहाशे भरली. |
28. | इस्साखार वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून सैन्यात सेवा करण्यास लायक होते त्या सर्वाची नोंद करण्यात आली; |
29. | ती मोजदाद एकूण चोपन्न हजार चारशे भरली. |
30. | जबुलून वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून सैन्यात सेवा करण्यास लायक होते त्या सर्वांची नोद करण्यात आली; |
31. | ती मोजदाद एकूण सत्तावन्न हजार चारशे भरली. |
32. | योसेफ पुत्रांपैकी एफ्राइम वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून सैन्यात सेवा करण्यास लायक होते त्या सर्वांची नोंद करण्यात आली; |
33. | 3ती मोजदाद एकूण चाळीस हजार पाचशे भरली. |
34. | मनश्शे वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून सैन्यात सेवा करण्यास लायक होते त्या सर्वांची नोंद करण्यात आली; |
35. | ती मोजदाद एकूण बत्तीस हजार दोनशे भरली. |
36. | बन्यामीन वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून सैन्यात सेवा करण्यास लायक होते त्या सर्वांची नोंद करण्यात आली; |
37. | ती मोजदाद एकूण पस्तीस हजार चारशे भरली. |
38. | दान वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून सैन्यात सेवा करण्यास लायक होते त्या सर्वांची नोंद करण्यात आली; |
39. | ती मोजदाद एकूण बासष्ट हजार सातशे भरली. |
40. | आशेर वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून सैन्यात सेवा करण्यास लायक होते त्या सर्वांची नोंद करण्यात आली; |
41. | ती मोजदाद एकूण एकेचाळीस हजार पाचशे भरली. |
42. | नफताली वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षाचे व त्याहून अधिक वयाचे असून सैन्यात सेवा करण्यास लायक होते त्या सर्वांची नोंद करण्यात आली. |
43. | ती मोजदाद एकूण त्रेपन्न हजार चारशे भरली. |
44. | मोशे, अहरोन आणि इस्राएलांच्या प्रत्येक घराण्यातील एक प्रमुख असे बारा नेते, ह्यांनी ही मोजदाद केली. |
45. | त्यांनी वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून सैन्यात सेवा करण्यास लायक असलेल्या प्रत्येक पुरुषाची त्याच्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे नोंद केली. |
46. | ती मोजदाद एकूण सहा लाख तीन हजार पाचशे पन्नास भरली. |
47. | इस्राएल लोकांबरोबर लेवी कुळांच्या दलातील लोकांची करण्यात आली नाही. |
48. | परमेश्वराने मोशेला सांगितले होते की, |
49. | “लेवी कुळांच्या दलातील लोकांची गणती करु नको किंवा इतर इस्राएल लोकांच्या गणतीत त्यांचा समावेश करुं नको; |
50. | लेवी लोकांना सांग की आज्ञापटाच्या पवित्र निवास मंडपाबद्दल ते जबाबदार आहेत; पवित्र निवासमंडप व त्याबरोबर त्यातील सर्व सामानाची त्यांनी काळजी घ्यावी. पवित्रनिवास मंडप व त्यातील सर्व सामान त्यांनी वाहून न्यावे. त्यांनी आपले तंबू पवित्र निवास मंडपाभोवती ठोकावेत आणि त्याची निगा राखावी. |
51. | जेव्हा जेव्हा पवित्र निवास मंडप हलवावयाचा असेल तेव्हा तेव्हा तो लेवी लोकांनीच उतरावा व तो उभारताना लेवी लोकांनीच तो उभा करावा; त्याची निगा राखणे हे त्यांचेच काम आहे; लेवी कुळापैकी नसलेला कोणी जर पवित्रनिवास मंडपाच्या सेवेचा प्रयत्न करु लागलां तर त्याला जिवे मारावे. |
52. | इस्राएल लोकांपैकी प्रत्येकाने आपापले तंबू आपापल्या दलाप्रमाणे आपापल्या छावणीत आपापल्या कुळाच्या निशाणाजवळ ठोकावेत. |
53. | परंतु लेवी लोकांनी आपले तंबू पवित्रनिवास मंडपाच्या सभोंवती ठोकावेत; त्यांनी आज्ञापट असलेल्या पवित्र निवासमंडपाचे रक्षण करावे म्हणजे इस्राएल लोकांवर संकट येणार नाही.” |
54. | परमेशवराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे इस्राएल लोकांनी सर्व काही केले. |
Numbers (1/36) → |