Micah (7/7)    

1. मी अस्वस्थ झालो आहे कारण माझी स्थिती गोळा केलेल्या फळासारखी आणि अगोदरच द्राक्षे तोडल्यामुळे खाण्यासाठी द्राक्षे शिल्लक नाहीत तशी झाली आहे. खाण्यासाठी द्राक्षे शिल्लक नाहीत. मला आवडणारी पहिल्या बहराची अंजिरे अजिबात नाहीत.
2. ह्याचाच अर्थ, सर्व प्रामाणिक लोक गेलेत. ह्या देशात चांगले लोक उरले नाहीत. प्रत्येकजण कोणाला तरी ठार मारण्यासाठी टपला आहे. प्रत्येकजण आपल्या भावाला सापळ्यात अडकविण्याच्या प्रयत्नात आहे.
3. लोक दोन्ही दोन्ही हातांनी दुष्कृत्ये करण्यात पटाईत आहेत. अधिकारी लाच मागतात. न्यायालयातील निकाल बदलण्यासाठी न्यायाधीश पैसे घेतात. “मोठे नेते” चांगले आणि न्याय निर्णय घेत नाहीत. ते मनात येईल ते करतात.
4. त्यांच्यातील अतिशय चांगलाही काटेरी झुडुपाप्रमाणे आहे. ते गुंत्तागुंत असलेल्या कोटेरी झुडुपापेक्षा वाकडा (कपटी) आहे. हा दिवस येईल असे तुमच्या संदेष्ट्यांनी सांगितले होते. तो तुमच्या पहारेकऱ्यांनी सांगितलेला दिवस आला आहे. आता तुम्हाला शिक्षा होईल. तुमचा गोधंळ उडेल.
5. तुमच्या शेजाऱ्यांवर विश्वास ठेवू नका. मित्रावरही विश्वासून राहू नका. तुमच्या पत्नीशीसुध्दा मनमोकळे बोलू नका.
6. स्वत:च्या घरातील माणसेच वैरी होतील. मुलगा वडिलांना मान देणार नाही. मुलगी आईविरुध्द जाईल. सून सासूच्या विरोधात जाईल.
7. म्हणून मी मदतीसाठी परमेश्वराकडे पाहतो. परमेश्वराने माझे रक्षण करावे म्हणून मी वाट पाहतो. माझा परमेश्वर माझे ऐकेल.
8. मी पडलो आहे. पण शत्रूंनो, मला हसू नका. मी पुन्हा उठेन आता मी अंधारात बसतोय पण परमेश्वरच माझा प्रकाश होईल.
10. माझा शत्रू मला म्हणाला: “तुझा देव परमेश्वर कोठे आहे?” पण माझा शत्रू ही पाहील आणि तो लज्जित होईल. त्यावेळी मी तिला हसेन. रस्त्यातील चिखलावरुन चालावे. तसे लोक त्याला तुडवीत चालतील.
11. तुमचे तट परत बांधण्याची वेळ येईल. त्या वेळेला, देशाचा विस्तार होईल.
12. तुमचे लोक तुमच्या देशात परत येतील. ते अश्शूर आणि मिसरमधील गावे येथून परततील. ते मिसरमधून व फरात नदीच्या पैलतीरावरुन येतील. पश्चिमेकडच्या समुद्राकडून आणि पूर्वेच्या पर्वतांतून ते येतील.
13. देशात राहणाऱ्या लोकांमुळे व त्यांच्या कृत्यांमुळे देशाचा नाश झाला आहे.
14. म्हणून तुझ्या दंडाने लोकांवर राज्य कर. तुझ्या मालकीच्या लोकांच्या समुदायावर राज्य कर. तो लोकांचा समुदाय एकटाच रानात आणि कर्मेल पर्वतावर राहतो. पूर्वीप्रमाणेच तो बाशान व गिलाद यांच्यामध्ये रातो.
15. तुम्हाला मिसरमधून बाहेर आणताना मी खूप चमत्कार केले. त्यांच्यासारखे आणखी चमत्कार मी तुम्हाला दाखवीन.
16. राष्ट्रे ते चमत्कार पाहून लज्जित होतील. माझ्या तुलनेत त्यांची “शक्ती” काहीच नाही, हे त्यांना दिसेल. ते विस्मयचकित होतील आणि आश्चर्याने तोंडावर हात ठेवतील. कान झाकून घेऊन ते ऐकण्याचे नाकारतील.
17. ते सापाप्रमाणे मातीत सरपटतील. भीतीने थरथर कापतील. जमिनीत राहणाऱ्या किड्यांप्रमाणे आपल्या बिळातून प्रभूकडे, आपल्या परमेश्वराकडे, यायला लागतील. हे परमेश्वरा, ते तुला घाबरतील आणि मान देतील.
18. परमेश्वरा तुझ्यासारखा दुसरा देव नाही. पापी लोकांनाही तू क्षमा करतोस. तुझ्या वाचलेल्या लोकांनाही तू क्षमा करतोस. परमेश्वर अनंतकाळ क्रोधाविष्ट राहणारा नाही. का? कारण त्याला दयाळू व्हायला आवडते.
19. तो परत येईल व आमचे सांत्वन करील. तो आमच्या पापांचा चुराडा करील आणि आमची पापे खोल समुद्रात फेकून देईल.
20. हे देवा, याकोबशी प्रामाणिक राहा. अब्रहामबद्दल तुला असलेले खरे प्रेम दाखव. फार पूर्वी तू आमच्या पूर्वजांना दिलेले वचन पाळ.

  Micah (7/7)