Isaiah (56/66)  

1. परमेश्वराने पुढील गोष्टी सांगितल्या, “सगळ्या लोकांशी न्याय्यबुध्दीने वागा. योग्य गोष्टीच करा. का? लवकरच माझे तारण तुमच्यापर्यंत येऊन पोहोचेल. माझा चांगुलपणा लवकरच सर्व जगाला दिसेल.”
2. जो देवाचा शब्बाथचा नियम पाळतो त्याला देवाचा आशीर्वाद मिळेल. जो माणूस पाप करीत नाही. तो सुखी होईल.
3. यहुदी नसलेले काही लोक देवाला येऊन मिळतील. ह्या लोकांनी असे म्हणू नये “देव त्याच्या लोकांबरोबर आमचा स्वीकार करणार नाही.” नपुसंकाने असे म्हणू नये “मी म्हणजे वठलेला वृक्ष आहे. मला मुले होऊ शकत नाहीत.”
6. यहुदी नसलेले काही लोक परमेश्वराची सेवा करण्यासाठी आणि परमेश्वराच्या प्रेमाखातर स्वत:हून परमेश्वराला येऊन मिळतील. ते परमेश्वराचे सेवक होण्यासाठी येतील. ते शब्बाथचा दिवस हा उपासनेचा विशेष दिवस मानतील. आणि काटेकोरपणे माझ्या कराराचे (नियमांचे) सतत पालन करतील.
7. परमेश्वर म्हणतो, “मी त्या लोकांना माझ्या पवित्र डोंगरावर आणीन. माझ्या प्रार्थनाघरात मी त्यांना सुखी करीन. त्यांनी मला अर्पण करण्यासाठी आणलेले होमबली आणि मला वाहण्यासाठी आणलेल्या वस्तू मला आवडतील. का? कारण माझे मंदिर सर्व राष्ट्रांचे प्रार्थनाघर होईल.”
8. परमेश्वर, माझा प्रभू असे म्हणाला. इस्राएलच्या लोकांना सक्तीने त्यांचा देश सोडावा लागला. पण परमेश्वर पुन्हा त्यांना एकत्र गोळा करील. परमेश्वर म्हणतो, “मी ह्या लोकांना गोळा करून एकत्र करीन.”
9. वन्य पशूंनो, या व खा.
10. रक्षक (संदेष्टे) आंधळे आहेत. ते काय करीत आहेत ते त्यांना समजत नाही. न भुंकणाऱ्या कुत्र्यांप्रमाणे ते आहेत. ते फक्त आडवे पडून झोपा काढतात. हो! त्यांना झोपायला आवडते.
11. ते भुकेल्या कुत्र्यांप्रमाणे आहेत. त्यांचे कधीच समाधान होत नाही. मेंढपाळांना आपण काय करीत आहोत हे माहीत नाही. ते त्यांच्या भटकल्या गेलेल्या मेंढ्यांप्रमाणे आहेत. ते हावरट आहेत. त्यांना फक्त स्वत:चा लाभ हवा आहे.
12. ते येऊन म्हणतात, “आम्ही थोडा द्राक्षरस पिऊ, आम्ही थोडे मद्य पिऊ. आम्ही उद्याही असेच करू. फक्त थोडे जास्त मद्य पिऊ.”

  Isaiah (56/66)