← Exodus (30/40) → |
1. | देव मोशेला म्हणाला, “धूप जाळण्यासाठी बाभळीच्या लाकडाची एक वेदी करावी. |
2. | ती चौरस असावी; ती आठरा इंच लांब व आठरा इंच रुंद असावी, आणि ती छत्तीस इंच उंच असावी; तिच्या चारही कोपऱ्यांना शिंगे असावीत; ती वेदीच्या एकाच अखंड लाकडाची करावी. |
3. | वेदीचा वरचा भाग व तिच्या चारही बाजू शुद्ध सोन्याने मढवाव्यात आणि वेदीभोवती सोन्याचा कंगोरा करावा. |
4. | त्या कंगोऱ्याखाली वेदीच्या एकमेकींच्या विरुद्ध बाजूंना सोन्याच्या दोन दोन गोल कड्या असाव्यात; त्यांच्यात दांडे घालून वेदी उचलून नेण्याकरता त्यांच्या उपयोग होईल. |
5. | हे दांडे बाभळीच्या लाकडाचे करुन ते सोन्याने मढवावेत. |
6. | वेदी अंतरपटासमोर ठेवावी; आज्ञापटाचा कोश अंतरपटाच्या मागे असेल; आज्ञापटाच्या कोशावर असणाऱ्या दयासनासमोर वेदी असेल; ह्याच ठिकाणी मी तुला भेटत जाईन. |
7. | “अहरोन दिव्याची तेलवात करण्यासाठी येईल त्या प्रत्येक सकाळी दररोज त्याने वेदीवर संगधी धूप जाळावा; |
8. | पुन्हा संध्याकाळी अहरोन दिवे लावण्यासाठी येईल तेव्हा त्याने वेदीवर सुंगधी धूप जाळावा; याप्रमाणे दररोज परमेश्वरापुढे सुंगधी धूप सतत पिढयानपिढया जाळावा. |
9. | तिच्यावर दुसऱ्या कोणत्याही प्रकारचा धूप जाळू नये किंवा हव्य अर्पण करू नये; तसेच अन्नार्पण किंवा पेयार्पण अर्पण करू नये. |
10. | “अहरोनाने वर्षातून एकदा वेदीच्या शिंगावर प्रायश्चित्त करावे; लोकांच्या पापांची भरपाई करण्यासाठी अहरोनाने पापार्पणातील रक्त घेऊन ते वेदीवर अर्पण करावे. ह्या दिवसाला ‘प्रायश्चित दिवस’ म्हणावे. हे परमेश्वरासाठी परम पवित्र आहे.” |
11. | परमेश्वर मोशेला म्हणाला, |
12. | “एकूण इस्राएल लोक किती आहेत याची तुला माहिती असावी म्हणून तू त्यांची शिरगणती करावीस; अशा प्रत्येक शिरगणतीच्या वेळी प्रत्येक इस्राएलाने स्वत:च्या जिवाबद्दल परमेश्वराला खंड द्यावा; जो कोणी असा खंड देईल त्याच्यावर भयंकर संकट येणार नाही. |
13. | शिरगणती झालेल्या प्रत्येक इस्राएल व्यक्तिने पवित्र निवास मंडपातील अधिकृत मापाने अर्धा शेकेल खंडणी द्यावी. (एका शेकेलाचे वजन वीस ‘गेरा’ असते) हा अर्धा शेकेल म्हणजे परमेश्वराला दिलेले अर्पण होय. |
14. | वीस वर्षे व त्याहून जास्त वयाच्या शिरगणती झालेल्या प्रत्येक इस्राएली माणसाने परमेश्वराला हे अर्पण करावे. |
15. | श्रीमंत माणसाने अर्धा शेकेलापेक्षा जास्त देऊ नये व गरीबाने अर्धा शेकेलापेक्षा कमी देऊ नये; सर्व जणांनी परमेश्वराला सारखेच अर्पण करावे; हे तुम्हाला आपल्या जिवाबद्दल प्रायश्चित्ताची खंडणी असे होईल. |
16. | हा पैसा इस्राएल लोकांकडून गोळा करावा आणि त्याचा दर्शनमंडपातील सेवेसाठी उपयोग करावा; हा पैसा म्हणजे परमेश्वराला आपल्या लोकांची आठवण राहण्याचा एक मार्ग होईल; लोक आपल्या जिवाबद्दल खंडणी देत राहतील.” |
17. | परमेश्वर मोशेला म्हणाला, |
18. | “पितळेचे एक गंगाळ बनवून ते पितळेच्या बैठकीवर ठेवावे, त्यातील पाण्याचा हात पाय धुण्यासाठी उपयोग करावा; ते दर्शनमंडप व वेदी यांच्यामध्ये ठेवावे व ते पाण्याने भरावे. |
19. | या गंगाळातील पाण्याने अहरोन व त्याच्या मुलांनी आपले हात पाय धुवावेत; |
20. | दर्शनमंडपात व वेदीजवळ जाताना प्रत्येक वेळी त्यांनी आपले हात पाय धुवावेत; असे केल्यास ते मरणार नाहीत. |
21. | त्यांनी आपले हात पाय धुतलेच पाहिजेत नाहीतर ते मरतील; हा अहरोन व त्याच्या लोकांसाठी कायमचा नियम होय; अहरोनाच्या मागे त्याच्या पुत्रपौत्रांसाठी पिढ्यान्पिढ्या हा नियम लागू राहील.” |
22. | मग परमेश्वर मोशेला म्हणाला, |
23. | “उत्तमात उत्तम मसाले घे; अधिकृत मापाप्रमाणे बारा पौंड म्हणजे पाचशे शेकेल प्रवाही गंधरस; त्याच्या निम्मे म्हणजे सहा पौंड म्हणजेच अडीचशे शेकेल सुंगधी दालचिनी, बारा पौंड म्हणजे पाचशे शेकेल सुंगधी बच. |
24. | आणि बारा पौंड म्हणजे पाचशे शेकेल तज आणि एक हीनभर जैतुनाचे तेल घे. |
25. | “व या सर्वाच्या मिश्रणाने अभिषेकासाठी पवित्र, सुंगधी तेल तयार कर; |
26. | हे पवित्र तेल दर्शन मंडपावर व आज्ञापटाच्या कोशावर ओतून त्यांना पवित्र कर; या गोष्टींना विशेष महत्व आहे हे यावरून दिसून येईल. |
27. | तसेच मेज व त्यांवरील सर्व समान, दीपवृक्ष व त्याची उपकरणे, धूपवेदी, |
28. | तसेच होमवेदी व तिचे सर्वसामान आणि गंगाळ व त्याची बैठक ह्यांसर्वावर तेल ओतावे. |
29. | त्यांना पवित्र करावे म्हणजे ती परमेश्वराला परमपवित्र होतील; ज्याचा त्यांना स्पर्श होईल ते पवित्र होईल. |
30. | “अहरोन व त्याच्या मुलांना तेलाचा अभिषेक कर म्हणजे ते पवित्र होतील. मग याजक या नात्याने ते माझी सेवा करतील; |
31. | इस्राएल लोकांना तू सांग की अभिषेकाचे तेल पवित्र आहे, पिढ्यान्पिढ्या ते केवळ माझ्यासाठीच वापरावे. |
32. | ह्या तेलाचा, ते साधे सुवासिक तेल असल्यासारखा कोणीही वापर करु नये; हे पवित्र तेल ज्याप्रकारे तयार केले तसे तेल कोणीही तयार करु नये; हे तेल पवित्र आहे आणि तुम्हालाही ते अगदी पवित्रच वाटले पाहिजे. |
33. | ह्या पवित्र तेलासारखे सुवासिक तेल जर कोणी तयार करील किंवा ते कोणा परकीयाला देईल तर त्याला आपल्या लोकांतून बाहेर काढून टाकावे.” |
34. | नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू हे सुवासिक मसाले म्हणजे उत्तम गंधरस, जटामांसी, गंधा बिरूजा व शुद्ध धूप आणावेस. ह्या सर्व वस्तू समभाग घ्याव्यात; |
35. | आणि गांध्याच्या कसबाप्रमाणे मिसळून त्यांचे सुवासिक धूप द्रव्य तयार करावे; तसेच त्यात मीठमिसळावे म्हणजे ते मिश्रण केलेल धूप द्रव्य शुद्ध व पवित्र होईल. |
36. | त्यातले काही कुटून त्याचे चूर्ण करावे, व ते दर्शन मंडपात पवित्र करारापुढे ठेवावे; ह्याच कोशापुढे मी तुला दर्शन देत जाईन; हे चूर्ण तुम्ही परमपवित्र लेखाचे. |
37. | या धूपद्रव्याचा फक्त परमेश्वरासाठीच उपयोग करावा; त्याच्या सारखे दुसरे धूप द्रव्य तुम्ही करु नये. |
38. | सुवासाचा आनंद घ्यावा म्हणून कोणी आपल्या स्वत:साठी असे धूप द्रव्य तयार करील तर त्याला आपल्या लोकांतून बाहेर काढून टाकावे.” |
← Exodus (30/40) → |