Esther (10/10)    

1. राजा अहश्वेरोशने लोकांवर कर बसवले. राज्यातील तसेच समुद्रकिनाऱ्याकडच्या दुरवरच्या नगरातील लोकांनाही कर भरावे लागले.
2. आणि अहश्वेरोशने जे पराक्रम केले ते पारस आणि मेदय राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिले आहेत. मर्दखयने केलेल्या इतर गोष्टीही या इतिहासग्रंथांमध्ये लिहिलेल्या आहेत. राजाने मर्दखयला महत्पदावर नेले.
3. राजा अहश्वेरोशच्या खालोखाल यहुदी मर्दखयचे स्थान होते. त्याचे यहुदी बांधव त्याला फार मान देत. कारण लोकांच्या भल्यासाठी तो खूप मेहनत घेई. मर्दखयमुळे सर्व यहुद्यांना शांतता लाभली.

  Esther (10/10)