← Deuteronomy (14/34) → |
1. | “तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची मुले आहात. तेव्हा कोणी मरण पावले तर शोक प्रदर्शित करायला अंगावर वार करुन घेणे, क्षौर करणे असे करु नका. |
2. | कारण इतरांपेक्षा तुम्ही वेगळे आहात. तुम्ही परमेश्वराची पवित्र प्रजा आहात. आपली खास प्रजा म्हणून त्याने जगभरातून तुमची निवड केली आहे. |
3. | “परमेश्वराला ज्यांची घृणा वाटते असे काही खाऊ नका. |
6. | दुभंगलेल्या खुरांचा आणि रवंथ करणारा कोणताही प्राणी खाण्यास योग्य आहे. |
7. | पण उंट, ससा व शाफान खाऊ नका. कारण ते रवंथ करणारे असले तरी त्यांचे खूर दुभंगलेले नाहीत. तेव्हा ते खाण्यास अशुद्ध समजावेत. |
8. | डुक्करही खाऊ नये. त्याचे खूर दुभंगलेले आहेत पण तो रवंथ करत नाही. तेव्हा तोही अशुद्ध होय. त्याचे मांस खाऊ नका, तसेच मेलेल्या डुकराला स्पर्शही करु नका. |
9. | “जलचरांपैकी पंख आणि खवले असलेला कोणताही मासा खा. |
10. | पण ज्यांना पंख आणि खवले नाहीत असा मासा खाऊ नका. ते अशुद्ध अन्न होय. |
11. | “कोणताही शुद्ध पक्षी खा. |
12. | पण गरुड, लोळणारा गीध, मत्स्यमाऱ्या, |
13. | गीध, ससाणा, वेगवेगळ्या जातीच्या घारी, |
14. | कोणत्याही जातीचा कावळा, |
15. | शहामृग, गवळणा, कोकीळ, बहिरी ससाणा, |
16. | पिंगळा, मोठे घुबड व पांढरे घुबड, |
17. | पाणकोळी, गिधाड, करढोख, |
18. | बगळा, सर्व प्रकारचे करकोचे, टिटवी, वाघूळ यापैकी कोणताही पक्षी खाऊ नये. |
19. | “पंख असलेले कीटक खाण्यास अशुद्ध होत. तेव्हा ते खाऊ नयेत. |
20. | पण कोणताही शुद्ध पक्षी खायला हरकत नाही. |
21. | “नैसर्गिक मृत्यू आलेला कोणताही प्राणी खाऊ नका. तो तुम्ही नगरात आलेल्या परक्या पाहुण्याला देऊ शकता. त्याला तो खायला हरकत नाही. किंवा त्याला तुम्ही तो विकू शकता. पण तुम्ही मात्र तो खाऊ नका. कारण तुम्ही परमेश्वर तुमचा देव ह्याची पवित्र प्रजा आहात. “करडू त्याच्या आईच्या दुधात शिजवू नका. |
22. | “दरवर्षी तुमच्या शेतात पिकवलेल्या धान्याचा एक दशांश हिस्सा काढून ठेवा. |
23. | मग परमेश्वराने निवडलेल्या त्याच्या वस्तीच्या ठिकाणी, त्याचा सहवास मिळावा म्हणून जा. धान्य, नवी, द्राक्षारस, तेल यांचा दहावा भाग, गुराढोरांचा पहिला गोऱ्हा यांचे तेथे सेवन करा. असे केल्याने तुमच्या परमेश्वर देवाबद्दल तुमच्या मनात सतत आदर राहिल. |
24. | पण एखादेवेळी हे ठिकाण फार दूर असेल तर हे सर्व तेथपर्यंत वाहून नेणे तुम्हाला शक्य होणार नाही. असे झाले तर, |
25. | तेवढा भाग तुम्ही विकून टाका. तो पैसा गाठिला बांधून परमेश्वराने निवडलेल्या जागी जा. |
26. | त्या पैशाने तुम्ही गायीगुरे, शेळ्या मेंढ्या, द्राक्षारस, मद्य किंवा कोणताही खाद्यपदार्थ विकत घ्या. आणि सहकुटुंब सहपरिवार त्याचा आनंदाने उपभोग घ्या. |
27. | हे करताना तुमच्या नगरातील लेवींना वगळू नका. त्यांनाही यात सामील करुन घ्या. कारण तुमच्याप्रमाणे त्यांना जमिनीत वाटा मिळालेला नाही. |
28. | दर तीन वर्षांनी त्या वर्षांच्या उत्पन्नातील दहावा भाग काढून ठेवा. गावातील इतरांसाठी म्हणून हे धान्य गावात वेगळे साठवून ठेवा. |
29. | लेवींना तुमच्यासारखे वतन नाही म्हणून त्यांनी तसेच इतर गरजूंनीही यातून धान्य घ्यावे. नगरात आलेले परकीय, विधवा, अनाथ मुले यांच्यासाठीही ते आहे. असे वागलात तर तुमचा देव परमेश्वर तुम्हाला सर्व कार्यात आशीर्वाद देईल. |
← Deuteronomy (14/34) → |